नमस्कार ! मी अविनाश जाधव
मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष
Slider

माझ्याबद्दल काही

मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. ठाणे आणि पालघर ह्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व झपाट्याने वाढ होत असलेल्या शहरातील सामान्य नागरिकांचे दैनंदिन आयुष्यातील समस्या सोडवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे.

 

सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचा कायम प्रयत्न असतो.
एका सामान्य मराठी कुटुंबात जन्माला येऊन वडिल ड्रायव्हर असून सुद्धा आमचे शिक्षण पूर्ण केले, नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अगदी कार्यकर्ता असल्यापासून ते आज जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे.

 

जनसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे,उपेक्षित समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणे एवढेच मी जाणतो. पण ते करत असताना कुठेही कायदा व सुव्यस्थेच उल्लंघन होणार नाही ह्याची सर्वतोपरी काळजी घेतो.

अविनाश जाधव

सस्नेह जय महाराष्ट्र!

सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत माझी ठाणे जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक केली, तो दिवस माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता, त्या दिवशी मी शपथ घेतली कि राजसाहेबांचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करीन…

 

मित्रांनो आपण सगळ्यांनी जे प्रेम आणि पाठिंबा अनेक माध्यमातून दर्शवला ते यापुढेही मला लाभूद्या, आपण सगळे एकत्र मिळून मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची दूरदृष्टी घेऊन असेच जोमाने काम करत राहू..

 

धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र!

आपलाच,

अविनाश जाधव

माझ्या गेल्या काही कारकिर्दीतील समाजोपयोगी कार्यांचा हा आढावा

माझी तडीपारी रद्द का करावी

माझी तडीपारी रद्द व्हावी ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १६,८२९ लोकांनी पिटिशन वर त्यांचा सहभाग नोंदवला

सोशल अपडेट्स ​

Play
Play
Play
Play
Play
Play
Play
Play
Play
Play
previous arrow
next arrow
previous arrownext arrow
Slider

जनसंपर्क कार्यालय

अविनाश जाधव मनसे कार्यालय

मीना अवेन्यू सोसायटी , गजानन वडापाव समोर ,विष्णू नगर ,नौपाडा ,ठाणे ,महाराष्ट्र . ४०० ६०२

©अविनाश जाधव